2006-10-08

पेन्टबॉल

गेल्या रविवारी आम्ही पेन्ट बॉल खेळायला गेलो. खरं तर जेव्हा ऑफ़िस मधल्या काही अति उत्साही लोकांनी पेन्ट बॉल चा बेत बनवला, इंडियन टिमचा (म्हणजे आमचा) फ़ारच उदासिन रिस्पॉन्स होता. पण शेवटी फ़क्त ३ जण फ़ायनल झाले (१ लास्ट मिनीट गळाला).
तेव्हा रविवारी सगळे ७ वाजता उठले (हो, सकाळचे). अणि अगदि वेळेत ठरलेल्या ठिकाणी पोहोचलो. आता तुम्हाला जो प्रश्न पडलाय, तोच आम्हालाही तिकडे पोहोचल्या नंतरहि तासभर पडला होता. हे पेन्ट बॉल म्हणजे नक्की काय?
पेन्टबॉल: पेन्टबॉल म्हणजे मिलीटरी पोषाखात, युद्धसदृश परीस्थितीत एकमेकांबरोबर हाणामारी करावयाचा खेळ होय. फ़क्त बंदुकीतुन खरोखरीच्या गोळ्यां ऐवजी पेन्टबॉल्स.
जवळ जवळ १.५ से.मी. डायामीटर (भुमिती इंग्रजीत शिकलोय :( ) असलेले छोटे छोटे बॉल्स, ज्या मध्ये रंग भरलेला असतो.
अता ही सगळी उठाठेव इतकी रियल कि काय संगु. एक २ चौ.कि.मी. क्षेत्रफ़ळ असलेला मस्तसा टापू (चहुबाजुंनी पाणी). त्यावर अगदि बोर्डर वर असतो असा टेरेन. म्हणजे बंकर्स वगैरे. झाडी पण खुप. थोडक्यात वेगवेगळ्या प्रकारे लपण्याची छान व्यवस्था होती. बंदुक तर अगदि खरीखुरी रायफ़ल वाटते. लांब लचक रेन्ज होती. लांबुन मारलेले पेन्ट्बॉल्स कहि लागत बिगत नाहित. पण जवळुन जर का चुकूनहि बसला ना शॉट, सणसणीत बसतो. अणि म्हणुनच तोंडवर मास्क लावावा लागतो.
गेम अशी होती कि हिरवा मास्क आणि काळा मास्क अशा दोन टिम्स केल्या होत्या (प्रत्येक टिम मध्ये २५ जण). अणि २० २० मिनीटांच्या मिशन्स ठेवल्या होत्या. मिशन मध्ये गोळी लागली कि तुम्हि बाहेर (त्या मिशन पुरते). प्रत्येक मिशन ला काहितरी ऑब्जेक्टिव्ह होतं. जसं कि शत्रुपक्षा कडचा झेंडा उडवायचा. वगैरे वगैरे...
थोडं फ़ार पळुन एका जगेवर थांबलं तर मास्क वर वाफ़ जमा होऊन दिसायचं बंद व्हायचं :)... मग काय, समोर हिरवा असो का काळा... दिसतय कुणाला. मार गोळी. या प्रकारात स्वत:च्या पक्षातलेच दोन जणांना ठार केलं. (तरी मला डाउट आला होता कि ते बॅक फ़ायर का करत नव्हते). पण आपला टिम मेट मेला याचं दुख: व्हायच्यापेक्षा आपला नेम बसला याचाच आनंद जास्तं.
खरं पहायला गेलं तर तसा हा खेळ अगदि स्ट्राटेगी बनवुन खेळायचा खेळ. पण कुणाकडे आहे इतका वेळ? त्यामुळे मिशन समजुन घ्या, अणि सुटा. प्रत्येकाकडे आपली स्वतःची वेगळी स्ट्राटेगी. अणि हीच खरी मजा. एकदा आम्ही (दोघे जण) ठरवलं कि शत्रु पक्षाच्या मागे जाऊन हल्ला बोलायचा. इतके मागे गेलो कि एकही शत्रु दिसेना. अणि जेव्हा कसाबसा एक काळा मास्क वाला दिसला, तर मिशन समाप्त. पण एकदा ही आइडिया मस्तं चालली. बरेच जण पुढे बघत असताना आम्हाल इझी टार्गेट्स मिलाले.
एकदा, एके ठिकाणि दुश्मन लपुन बसला होता. अणि आम्ही तिघे जण त्याच्या मागावर होतो. आमच्यातल्या एकाने कमांडो स्टाईल सिग्नल केला. जरी कुठले ही पुर्वनियोजीत इशारे ठरले नव्हते, तरी याचा अर्थ सरळ होता. मी वेगळ्या रस्त्याने मागुन हल्ला केला... अणि दुश्मन ठार... लई मजा आली :)
एक दोन मिशन मध्ये मला एकही गोळी नाही लागली. पण फ़ार वेळ हा आनंद टिकुन नाही रहिला. समोर बघत असताना बाजुने गोळ्या लागल्या अणि बाजुला बघताना समोरुन गोळ्या लागल्या.
शेवटची मिशन होती गोळ्या संपेपर्यंत मारामारी. अणि याच मिशन मध्ये एका मुर्खाने अगदि जवळुन फ़ायर केले. माझ्या हातवर जोरात गोळी लागली. मी नालायका सारखा खेळत राहिलो (नियमानुसार मला बेस कॅम्पवर जायला पाहिजे होतं). अणि मग एक शोर्ट रेन्ज सरळ तोंडावर (म्हणजे मास्क वर). पण फ़ोर्स इतका होता कि मास्क मधुनही ते लिक्विड सनसनीत गालावर लागलं.
शेवटी संपला एकदाचा हा खेळ.
नंतरचे दोन दिवस हात पाय दुखत होते... पण खरं तर, द एक्स्पेरियन्स वॉज वर्थ इट.

0 Comments:

Post a Comment

<< Home